शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मानसिक नैराश्य, 24.7 टक्के शेतकरी नैराश्यग्रस्त

शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहिले जाते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परीवाराला आर्थिक मदतही दिली जाते. अलिकडे मात्र नुकतेच यासंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे त्यांचे मानसिक नैराश्य असल्याचे समोर आले आहे.विदर्भातील साठ टक्के शेतकऱ्यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.

अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

विदर्भातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी तज्ज्ञांची आणि प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती सरकारने करावी, असेही निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. या सर्वेक्षणात विदर्भातील एकूण 300 कुटुंबांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 34.7 टक्के शेतकऱ्यांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे आढळली आहेत. 55 टक्के शेतकरी तीव्र चिंताग्रस्त असल्याचे आढळून आले. सर्वेक्षण करण्यात आलेल्या कुटूंबातील 24.7 टक्के शेतकरी हे नैराश्यग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.