कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून ‘या’ जिल्ह्यात जनता कर्फ्यु

अहमदनगर – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून जनता कर्फ्यु लावण्यात आला असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या आगळ्यावेगळ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आजपासून जनता कर्फ्यु लावण्यात आला असून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यत सेवा सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आदेशाद्वारे जाहीर केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात 18 एप्रिल ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हा आदेश सुरू राहील. त्यामुळे आता आजपासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसणार आहे.

यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशासह हे आदेश लागू असणार आहेत.या आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या आगळ्यावेगळ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या आणि प्रशासनाची शिस्त मोडणाऱ्या या नागरिकांना आता पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोना वरील लेक्चर ऐकावे लागणार आहे. हे लेक्चर किती वेळ ऐकावे लागेल हे सांगता येणार नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –