पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसकडून ‘हे’ असू शकतात उमेदवार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीत पुणे लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुणे लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता असून त्याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली.

2014 मधे काँग्रेसच्या वतीने विश्वजित कदम या युवा चेहऱ्याला इथे संधी दिली होती. मात्र मोदी लाटेत पुण्यासारख्या मतदारसंघात त्यांचा निभाव लागला नाही. आता मोदी लाट ओसरली असल्याने स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवाराला  पुणेकर मतदार कौल देवू शकतो असा विश्वास असल्यानेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू असल्याची माहिती आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचाही मागील दिड-दोन वर्षापासून पुणे काँग्रेसमधला वावर व संपर्क वाढल्याचा दाखला देत आगामी लोकसभेचे तेच उमेदवार होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून विनायक निम्हण व राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र पक्षांतर्गत अहवालासह काही खासगी कंपन्याकडूनही मतदारसंघाची मानसिकता पडताळणी सुरू अाहे.

पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा