भोर तालुक्यातील ‘भात लावणी’ महोत्सवाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद !

पुणे : ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ आणि ‘फूटलूज जर्नीज’ यांच्या संयुक्तपणे भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यातील कुरुंजी येथे पुणेकरांसाठी ‘भात लावणी’चा आनंद देणारा ‘भात लावणी महोत्सव’ आयोजित केला होता.

रविवार दिनांक 15 जुलै रोजी आयोजित प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर भात लागवडीचा अनुभव आणि संवाद असे स्वरूप असलेल्या या उपक्रमाला पुणेकर युवक -युवतींनी भरघोस प्रतिसाद दिला. ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ आणि ‘फूटलूज जर्नीज’ यांच्या संयुक्तपणे हा भातलावणी महोत्सव कुुरुंजी येथे झाला. यावेळी ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव तसेच ‘फूटलूज जर्नीज’ चे संचालक परेश देशमुख यांनी संयोजन केले.

भोर तालुक्यातील ‘भात लावणी’ महोत्सवाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद !

रविवारी भाटघर धरणाच्या काठावरील भातशेतीत दिवसभर ही भात लावणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना भात लागवडीची माहिती दिली गेली.