वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करा ; पुणे जिल्हा परिषदेने दिले आदेश

पुणे जिल्हा परिषद

पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागाकडून वैयक्‍तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज मागविले असता, शेतकरी आणि महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी तत्काळ वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करावीत, वेळेत बिले सादर झाली तर अनुदान मिळेल, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले.

कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभ योजनेतून यावर्षी तेरा अवजारे दिली जाणार आहेत. त्यामध्ये मोटार पंपसंच, डिझेल इंजिन पंपसंच, पीव्हीसी पाइप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप, स्प्रेपंप ऑइल इंजिनसह प्लॅस्टिक क्रेटस, प्लॅस्टिक ताडपत्री, सरी रिजर ट्रॅक्‍टरचलित, इलेक्‍ट्रॉनिक कडबाकुट्टी यंत्र मोटार या वस्तूंचा समावेश आहे.

तसेच लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत वस्तू खरेदी करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. याद्या प्रसिद्ध केल्यापासून लाभार्थ्यांना वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे २१ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामधील काही विभागाची मुदत ही संपली आहे. वस्तू खरेदी पूर्ण झाल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर अनुदान जमा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकरी आत्महत्येच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ

उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचे जिल्ह्यातील सर्व गावांना समान वाटप करणार – पालकमंत्री

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाची तीन सदस्यीय समिती नेमून

आश्वासनावर जगविणाऱ्या या सरकारला धडा शिकवणार – रविकांत तुपकर