‘या’ जिल्ह्यामध्ये ‘पणन’कडून २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी

कापसाची खरेदी

नांदेड – कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.

साधारणत: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते. याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्तमध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील कापसाचे भरपूर प्रमाणात उत्त्पन्न घेतले जाते. तसेच कापसाची खरेदी ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.

नांदेड जिल्ह्यात पणनकडून भोकर व तामसा (ता. हदगाव) या दोन खरेदी केंद्रांवर चार कॉटन मिलवर सध्या २६ हजार ६१ क्विंटल खरेदी झाली, अशी माहिती पणनच्या विभागीय कार्यालयाकडून मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी (सीसीआय) कापूस खरेदी होत आहे. तसेच या महासंघाकडून भोकर येथील मंजित कॉटन व व्यंकटेश्वरा जिनींग या दोन ठिकाणी कापूस खरेदी सुरु आहे.

तसेच, तामसा (ता. हदगाव) येथील बालाजी कॉटनस्पीन व नटराज कॉटन प्रायवेट लिमिटेड या दोन ठिकाणी देखील कापूस खरेदी सुरु आहे. या दोन्ही ठिकाणाहून एकूण २६ हजार ६१ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तसेच कापसाची खरेदी ही केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार होत आहे.

महत्वाच्या बातम्या –