भंडारा जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात

अवकाळी पावसाने भंडारा जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून भंडारा येथे अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारच्या रात्री म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी रात्रभर बरसलेल्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र पाणी साचले होते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली.

भेंडी लागवड पद्धत

यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील भर रबी हंगामात भरून निघावी यासाठी मोठ्या शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा अंदाज घेऊन नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला.

शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद

गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पावसानंतर जमीनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ९ हजार ९६२.९६ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७७४६.२८ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच मोहाडी ६ हजार ८४६ हेक्टरपैकी ७०२३, तुमसर तालुक्यात ६ हजार २९० हेक्टरपैकी ५५२७.९० पवनी १४ हजार ९२८ पैकी १४,६१४.५०, साकोली ३३६२ हेक्टरपैकी ४३४४, लाखनी ६४१५.१० पैकी ६१८६.१५ तर लाखांदूर ८३८४ हेक्टरपैकी १२०३५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले नाही. रबी हंगामात शेतकºयांना लागवडीसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री घोडे नाचवून जनजागृतीचा ढिंढोरा पिटल्याचे शेतकरी सांगतात.