शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र या – रघुनाथदादा पाटील

टीम महाराष्ट्र देशा- ‘७० वर्षानंतर’ या ‘लार्ज शॉर्ट फिल्म’ प्रकारातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर चित्रपटांचा प्रिमियर शो नुकताच पार पडला. संगमनेर येथील महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात हा कार्यक्रम झाला.याठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, आ.डॉ. सुधीर तांबे, सत्यशोधक चळवळीचे किशोर ढमाले,चित्रपट समीक्षक अनिल म्हमाणे,लेखिका करुणा मिनचेकट , महाविद्यालयाचे प्रा.डॉ. के.के.देशमुख आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाध दादा पाटील यांनी सध्याच्या राजकीय परीस्थिती वर बोलताना शेतकऱ्यांची होणारी परवड मुलभूत प्रश्न,सततचा दुष्काळ, भांडवलदार धार्जिणे धोरण शेतकरी विरोधी कायदे आणि विविध विविध शेत्रातील शेतकऱ्यांचे शोषण या विरोधी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

लघुपटाचे समीक्षक अनिल म्हमाणे यांनी लघुपटात रेखाटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शेतमालाचा बाजार भाव कर्ज बाजरी शेतकरी , मुलांचे शिक्षण, मुलींची लग्न या अडचणींवर त्यांचे आणि सरकारचे मत व्यक्त केले. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाय, अनेक पॅकेज मंजूर होतात तरीही परिस्थिती बदलत नाही. तोवर वरवरचे उपाय फोल ठरणार असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा पाठींबा