भाकर नसणं, रक्त येणं हे तर होतंच असतं, यात नवीन काय ? ; रघुनाथदादांनी तोडले अकलेचे तारे

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करत हजारो श्रमिकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईची वाट धरली आणि सरकारला झुकवत कष्टकऱ्यांच्या अन्यायाला आवाज मिळवून दिला. पण या शेतकरी, श्रमिक, कष्टकऱ्यांच्या अभूतपूर्व लढ्याची उपेक्षा खुद्द शेतकरी नेतेच करत आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे रघुनाथदादा पाटलांनी खायला भाकर नसणं, रक्त येणं हे तर होतंच असतं, यात नवीन काही नाही अशी संतापजनक टिप्पणी केली आहे.

”अशा उन्हात शेतकऱ्यांना चालवलं कशाला? नाशिकलाही यावर तोडगा निघाला असता. मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता की मंत्र्यांना? या मोर्चामागे निव्वळ राजकारण आहे. मुख्यमंत्री राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं हे दाखवायचं आहे. याने काही होणार नाही, जनता आता हुशार झाली आहे,” अस वक्तव्य रघुनाथदादा पाटील यांनी केल आहे.

पहा हा व्हिडीओ रघुनाथदादांना यात नवीन काही वाटत नाही 

हा कार्यक्रम सुकाणू समितीकडून आयोजित केला असता तर वेगळं महत्त्व आलं असतं, त्यांच्या पक्षात आम्ही का जायचं, असा उलट सवाल त्यांनी केला. प्रत्येक पक्षाचा वेगळा अजेंडा असतो. सुकाणू समितीमध्ये सर्व संघटनांचे कार्यकर्ते आहेत. हा त्यांचा वैयक्तिक मोर्चा होता, अशा उलट्या बोंबा सुद्धा तथाकथित शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी मारल्या आहेत.