भोपाळ – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाल्यापासून काँग्रेसने या कायद्यास जोरदार विरोध केला होता. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकांना मंजुरी देऊन कायदायत रूपांतर केल्याने काँग्रेसने देशभरात आंदोलन उभारलं आहे.
काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपसह मित्रपक्षांनी टीका केली असून हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असून दलालांना चाप बसवणारे आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनी जर एखाद्या पिकाच्या पनावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन असं आव्हान त्यांनी दिलं आहे. गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शेखावत म्हणाले, “राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक कळणार नाही. तसेच जर या बहिणभावाने शेतातील पीकाच्या पानांवरुन ते कशाच पीक आहे हे ओळखल्यास आपण राजकारण सोडून देऊ.”
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुढील सहा ते सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस
- ‘हा’ साखर कारखाना 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु व्हावा
- शांत आणि निवांत झाेप लागण्यासाठी ‘या’ काही सोप्या टीप्स, जाणून घ्या