‘कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली, हे देखील राहुल गांधींना माहित नाही’

ट्रॅक्टर सोफा

भोपाळ – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाल्यापासून काँग्रेसने या कायद्यास जोरदार विरोध केला होता. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकांना मंजुरी देऊन कायदायत रूपांतर केल्याने काँग्रेसने देशभरात आंदोलन उभारलं आहे.

काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपसह मित्रपक्षांनी टीका केली असून हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असून दलालांना चाप बसवणारे आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का पसरवत आहे? राहुल गांधी ट्रॅक्टर सोफा लावून फिरत आहेत. शेतकरी किंवा शेतीबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. एवढंच काय कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली, हे देखील त्यांना ठाऊक नसेल,’ अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना संपवले. त्याच पद्धतीने शेतकरी आणि मजुरांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी तीन नवे कृषी कायदे बनवले, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –