पुन्हा पाऊस: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

मुसळधार पाऊस

मुंबई –  हवामान (Weather) विभागाचा अंदाजानुसार राज्यात थंडीचा कडाका (Cold snap) वाढणार आहे  आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  आज मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.. तर राज्यातील नाशिक, नागपूर , पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे.  पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या भागांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर या भागांमध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.  तर राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे.  मुंबईत 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर नागपुरात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे

महत्वाच्या बातम्या –