मुंबई – यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ६ जानेवारीपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे.
हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार ६ जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरणसह या भागात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह इतर राज्यातही कडाक्याची थंडी वाढत आहे, मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे. तर राज्यातील इतर भागात हुडहुडी राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- धोका वाढला! देशात एकाच दिवशी तब्ब्ल ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद
- पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड, व्हिडीओ व्हायरल; सत्य जाणून तुम्ही थक्क व्हाल!
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ४४ साखर कारखान्यांकडून तब्बल १११.२१ लाख टन उसाचे गाळप
- चांगली बातमी – राज्यात थंडीचा कडाका कमी होणार
- आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या – बच्चू कडू
- मुळा लागवड पद्धत, जाणून घ्या
- टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल, जाणून घ्या