पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

हवामान

मुंबई –  हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार  २१ , 22 आणि 23 जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस (rain) पडणार आहे.  उद्या  21 जानेवारीला तुरळक ठिकाणी पाऊस गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  २२ आणि २३ जानेवारीला पावसाची (rain) शक्यता  हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या  अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (rain) पडला.  तर राज्यात काही ठिकाणी गरपती झाल्या. तर या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (rainfall) पोषक हवामानाची तयार झालं आहे. 22 आणि 23 जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.



राज्यात 22 आणि 23 जानेवारी रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 22 जानेवारी रोजी राज्यातील मुंबई,  पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  तर 23 जानेवारी रोजी हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –