Rain Alert | टीम कृषीनामा: देशातील वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या ठिकाणी काही भागात बर्फवृष्टी होत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात थंड वाऱ्यांमुळे तापमानात चढ-उतार सुरू आहे. वेस्टन डिस्टर्बन्समुळे हिमालयीन भागामध्ये पाऊस (Rain Alert ) आणि बर्फवृष्टी सुरू आहे.
लडाख, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Alert ) पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या वातावरणाचा परिणाम राज्यातही होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यामध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, जळगावमध्ये गेल्या 48 तासांत राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी 7.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर, पुण्याचा पारा देखील 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडी पुन्हा वाढली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महत्वाच्या बातम्या