पुढील चार दिवस पावसाचे; हवामान खात्याने महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना केला अलर्ट जारी

पाऊस

मान्सून महाराष्ट्रात पोहोचला आहे. अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये नुकताच चांगला पाऊस झाला आहे.

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50 हजार

येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी, जोरदार वारा देखील येऊ शकतो. अजूनही मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी लोकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा सूचवण्याच्या दृष्टीने बुधवारी पुण्यात व्यापक बैठक

याच दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) देशातील सहा राज्यात मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्रद्यांच्या मते 4 ते 6 जुलै या काळात सहा राज्यात मुसळधार पाऊस पडेल. त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे हवामान खात्याने बुधवारी 5 जुलैपर्यंत या सहा राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच 3 आणि 4 जुलै रोजी कोकण, गोवा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

youtube.com/watch?v=yikHPyyzSv0

महत्वाच्या बातम्या –

कृषी विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान – महसूलमंत्री

उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…
Loading…