पावसाचा पुन्हा मुक्काम ; सोमवारीही पावसाचा अंदाज

rain

अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तसेच, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही परिस्थिती अजून पुढचे दोन ते तीन दिवस राहणार आहे, त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही उद्यापर्यंत असेच वातावरण कायम असेल.त्याचबरोबर आज आणि उद्या राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

मतदार ओळखपत्र नसल्यास या ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार – डॉ.अनिल बोंडे

Loading…