विदर्भ व मराठवाड्यातील शासकीय इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणार – डॉ. परिणय फुके

डॉ. परिणय फुके

रेन वॉटर हार्वेस्टिंग (जलपुनर्भरण) या व्यवस्थेची आवश्यकता मराठवाडा आणि विदर्भात अधिक आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग मराठवाडा व विदर्भातील जुन्या शासकीय इमारतींसाठी सक्तीचे करण्यात यावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांनी काल मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बांधकाम विभागाचे सचिव अ.अ.सगणे, अधीक्षक अभियंता रणजित हांडे,उप अभियंता सुभाष माने आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. फुके म्हणाले, भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. विदर्भ मराठवाड्यासह रेन वॉटर हार्वेस्टिंग मुंबई, पुणे आणि नाशिक, या विभागातील सर्व जुन्या शासकीय इमारतीमध्ये करणे आवश्यक आहे. यामुळे राज्यात उन्हाळ्यामध्ये जाणवणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.

महत्वाच्या बातम्या –

शासकीय कार्यालयांसाठी सौरऊर्जेचा वापर – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

आदिवासी बांधवाना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणार – डॉ.परिणय फुके

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी सिंगापूरची कंपनी अर्थसहाय्य करणार
Loading…