राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर राहणार

पाऊस

पुणे – राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिलेली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आज (बुधवारी) पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती दोन दिवसांत उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून आॅक्टोबर हिटचा चटकाही वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढउतार होत आहे. उद्या (गुरूवारी) रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सोलापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. शुक्रवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडले. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील. शनिवारी (ता. २४) अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात काहीसा पाऊस पडणा असून इतर भागात उघडीप राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –