‘ह्या’ राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस !

राज्यात

महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट संपत नसतानाच. पुन्हा शेकऱ्यांच्या डोक्यावर आभाळाचे ढग तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्टात २२,२३ आणि २४ तारखांना पुढील जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे – मुंबई ठाणे पुण्यासह कोकण विभाग तसेच, नाशिक, उत्तर-मध्य महाराष्ट्रात २२ जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता(Chance of light rain)  हवामान विभागाने व्यक्त(Expressed) केली आहे. २३ जानेवारीला कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या एकापाठोपाठ एक पश्चिमी चक्रवात निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम हवामानावर(On the weather) होत असल्याचे दिसते. सध्या उत्तरेकडील राज्यात थंडी कमी झाली आहे.(The cold has subsided in the state.) त्यामुळे महाराष्ट्रातही रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात २२ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण भाग आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राजस्थानमध्ये चक्रीय चक्रवात(Cyclone) निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून, २२ आणि २३ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तसेच २३ जानेवारीला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कमी प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याच कालावधीत विदर्भात गडचिरोली, गोंदियातही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे राहील.(The weather will remain dry.)
कारण काय?

महत्वाच्या बातम्या –