येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

मुसळधार पाऊस

मुंबई, उपनगरे, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल वाहतूक, तसेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.

मुंबई पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साठल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तिकडे कल्याणमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल अर्धा तास उशिरा धावत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे आता हवामान विभागाचा

करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता