जून महिन्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद; सरासरीपेक्षा अधिक पाऊस

पाऊस

मुंबई –  राज्यात यंदा मॉन्सूनची सुरुवातच यंदा दमदार झाली आहे. हंगामातील पहिला महिना असलेल्या जून महिन्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, सरासरीपेक्षा (१११ टक्के) अधिक पावसाची नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांनी केली तक्रार ; बायोमेट्रिक अंगठे न आल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित

औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ११० टक्के अधिक, नगरमध्ये १०३ टक्के अधिक, बीडमध्ये ९१ टक्के, लातूरमध्ये ७९ टक्के, जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा ७२ टक्के अधिक पाऊस पडला आहे. याशिवाय जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतही पावसाने सरासरी ओलांडली आहे.
Loading…