उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पाऊस

पुणे – मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान तयार होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यातही विजा, मेघगर्जेनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

आज सोमवारी  सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी पडल्या. मालवण येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

उद्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘आरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, पुणे
जिल्ह्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय ? हे नक्की वाचा

मेथीची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे