राज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार 

पाऊस

पुणे – पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापासून (ता.१६ सप्टेंबर) पावसाचा जोर वाढणार आहे अशी शक्यता आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटकची किनारपट्टी दरम्यान अजूनही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्राचा ईशान्य भाग व दक्षिण गुजरातची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाले आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचे पट्टा असून अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती दक्षिण गुजरात पश्चिम राजस्थानपर्यंत सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे असा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

बंगाल उपसागराच्या पश्चिममध्ये आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा पट्टा बिकानेर, जयपूर, सागर, दुर्ग, जगदलपूर आणि दक्षिण – आग्नेय ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये भाग व उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरापर्यंत आहे. उत्तर प्रदेशच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे असा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

महत्वाच्या बातम्या –