राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

पाऊस

पुणे – विदर्भ ते पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच महाराष्ट्राची उत्तर किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते   जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. तर, सोमवारपासून (ता.१४ सप्टेंबर ) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस प,  अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून अरबी समुद्राचा पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती निर्माण झाली होती. तर बंगालचा उपसागराच्या पश्चिमेमध्ये आणि आंध्रप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता.१३) तयार होण्याची शक्यता वामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे..तर पश्चिम बंगालच्या परिसरात समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही भागात अधूनमधून ढगाळ हवामान तयार होत आहे.

सोमवारपासून (ता.१४ सप्टेंबर) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस  पडण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील. तर अनेक ठिकाणी सकाळपासून कडक ऊन पडेल. पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

महत्वाच्या बातम्या –