गोंदियामध्ये सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी

कृत्रिम पाऊस

गोंदिया मध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२०ला सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. गोंदियासह, आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्यात जवळपास तासभर पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला आणि रब्बी हंगामातील धानाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस परतीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच जिल्ह्यात ५ फेब्रुवारी २०२० पासून ढगाळ वातावरण आहे. काल म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२०च्या सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास परतीच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली. जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४.८० मि.मी.पावसाची नोंद झाली.

सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी आणला आहे. या धानाला काल म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२०ला झालेल्या परतीचा पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर रब्बी हंगामातील १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्या हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुन्हा परतीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.