‘या’ जिल्ह्यात पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता

शेतकरी

पुणे – परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या पावसाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर येथील बावडा येथे ७९.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिकांच्या नुकसानीमध्ये आणखी मोठी भर पडली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातून अजूनही शेतकरी सावरलेला नाहीच. तोच रविवारी (ता. १९) दुपारी पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी कमीअधिक पाऊस पडला असला तरी काही ठिकाणी जोरदार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. यामुळे शेतातून पाणी वाहू लागल्याने ओढे, नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. धरणातील पाणी पातळीतही वाढ झाली असून काही धरणांतून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, बाजरी पिकांसह फळबाग व भाजीपाला पिकांच्या नुकासानीमध्ये आणखीभर पडली आहे.

पुणे ३४.८, केशवनगर ३४.८, कोथरूड ३६.०, खडकवासला ४६.८, थेऊर ३१.५, उरूळीकांचन ३७.८, खेड ४०.८, भोसरी २९.१, चिंचवड १७.३, कळस ४०.०, हडपसर १२.० मिलिमीटर पाऊस पडला. तर मुळशी तालुक्यातील पिरंगूट २३.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर पौड, थेरगाव, माले, मुठे  हलका पाऊस पडला. भोर तालुक्यात वेळू येथे ४५.५ मिलिमीटर पाऊस पडला असून नसरापूर, किकवी, निगुडघर येथे चांगलंच पाऊस पडला. मावळमधील काले येथे २४.३ मिलिमीटर तर लोणावळा, वेल्हा तालु्क्यातील पाणशेत, विंझर, अंबावणे, जुन्नरमधील बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूरमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला.

खेडमधील आळंदी ३७.३, पिंपळगाव २३.८ मिलिमीटर तर  वाडा, राजगुरूनगर, कुडे, पाईट, चाकण, कन्हेरसर, कडूस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर  शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर येथेही हलका पाऊस पडला. पूर्वेकडील बारामतीतील मोरगाव २५.०, लोणी २०.५ मिलिमीटर तर  बारामती, माळेगाव, पणदरे, सुपा, उंडवडी, इंदापूरातील भिगवण ३७.९, इंदापूर ३७.९, लोणी ३७.९, निमगाव ३७.९, अंथुर्णी २३.८, सणसर ३७.९ काटी ११.० मिलिमीटर पाऊस पडला. दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड येथेही हलका पाऊस पडला. पुरंदरमधील कुंभारवळण ५५.०, राजेवाडी २१.८ मिलिमीटर तर सासवड, भिवंडी, जेजुरी, परिंचे येथेही पावसाचा शिडकावा झाला.

महत्वाच्या बातम्या –