‘या’ जिल्ह्यात पावसाचा कहर

पाऊस

सातारा – परतीचा पाऊस जिल्हाभर मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारी (ता.१४) सर्वाधिक दुष्काळी तालुक्यांना पावासाने झोडपून काढले आहे.
ऐन खरीपाच्या काढणीत पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसाने खरीप हंगामातील पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दुष्काळी पट्ट्यातही नद्या भरून वाहू लागल्या आहेत.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभर तसेच रात्रीही पावसाचा जोर कायम राहिला होता. माण, खटाव, फलटण कोरेगाव, खंडाळा या तालुक्यातही मुसळधार पाऊस पडला आहे. ११ पैकी ११ तालुक्यात २४ तासांत ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. फलटण येथे बाणगंगा नदीस पूर आला.
माण येथील माणगंगा तसेच खटाव तालुक्यातील येरळा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

खटाव तालुक्यातील नेर तलावही तुंडूब भरून वाहू लागला आला आहे. जिल्ह्यात सलग पावसामुळे पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान सुरू आहे. या पावसाचा पश्चिमेकडील सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, ऊस, स्ट्रॅाबेरी तर पुर्वेकडील ज्वारी, बाजरी, कांदा, बटाटा आदी पिकांची मोठी हानी झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. प्रमुख नद्या,नाले, बंधारे दुधडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

महत्वाच्या बातम्या –