राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाने झोडपले

पाऊस

मुंबई – राज्यातील मुंबई आणि कोकणातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत १८ जुलै रोजी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मुंबईतील सांताक्रुज भागामध्ये सुमारे 234.9मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर मुंबईतील कल्याण, भांडुप, अंधेरी, बोरिवली या भागामध्ये पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तर राज्यातील नगर, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहे. तर राज्यातील पश्चिम पट्ट्यातील धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. तर यामुळे राज्यातील कोयना, भंडारदरा, मुळा, पवना, खडकवासला, गंगापूर, उजनी या धरणाच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झालेली नाही.

र=तर राज्यातील जळगाव जिल्ह्यातही पाऊस नसल्याने पिके सुखत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तर राज्यातील नांदेड, परभणी परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अनेक भागात ढगाळ वातावरण होतं. तर विदर्भात अजूनही चांगला पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

महत्वाच्या बातम्या –