परतूर – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी झाली त्यासोबतच पावसामुळे सर्व प्रकल्प हे भरले आहेत. त्यामुळे त्यांचे दरवाजे उघडले. परतूर आणि मंठा तालुक्यात मागील काही दिवसांत खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न दुधना प्रकल्पाची दरवाजेही उघडले. लोअर दुधनाचे पाणी संपादित न केलेल्या जमिनीत गेल्याने पिकांची खूप नासाडी झाली आहे.
यामुळे त्या सर्व जमिनी ज्या जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे त्या तात्काळ शासन संपादित करून त्याचा मोबदला देणार व पिकांचे पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई देणार असल्याचे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी परतूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यांनी सांगितले. दुधना प्रकल्प भरल्याने या धरणाच्या शेजारी असणाऱ्या व भूसंपदीत न केलेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी आले. यामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस, तूर, ऊस या सारखी पिके पाण्यात गेली.
जालना जिल्ह्यातील परतूर,मंठा व घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. pic.twitter.com/uqhbl4XvZW
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 4, 2020
यामुळे पालकमंत्री राजेश टोपे यांचा नुकसान पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैलगाडीतून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. तसेच हा प्रश्न येत्या पंधरा दिवसांत संबंधित खात्याच्या मंत्र्यासोबत बैठक घेऊन मार्गी लावणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- राज्यात पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता