मंत्र्यांना यापुढे झोडपून काढू- राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा- अडचणीत सपडलेल्या शेतकऱ्यांना भक्कम आधार न देता भुल- थापा देऊन त्याची फसवणूक करणाऱ्या मंत्र्यांना यापुढे झोडपून काढू असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी लातूर येथे दिला आहे. गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार शेट्टी यांनी विश्राम गृहावर शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी
शेतकऱ्यांना बुडवणारे व व्यापाऱ्याला पोसणारे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांनी माल विकल्यास हमीभाव केंद्र सुरू केली आहेत. साखर उत्पादन वाढणार असल्याचे भासवत साखरेचे भाव पाडले गेले आहेत. आयात कर वाढवल्याने परदेशातून चिमुटभरही साखर आयात होणार नाही. साखरेच्या पडलेल्या दराचा किरकोळ बाजारातील साखरेच्या किमतीवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे यामध्ये काळेबेरे असून त्यात राज्यातील काही साखर कारखानदारांचाही त्यात समावेश असल्याचे सांगितले. गेल्या दोन महिन्यात ज्यांनी साखर विकली व खरेदी केली अशांची चौकशी करावी.अडचणीत सपडलेल्या शेतकऱ्यांना भक्कम आधार न देता भुल- थापा देऊन त्याची फसवणूक करणाऱ्या मंत्र्यांना यापुढे झोडपून काढू .