त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत – राजू शेट्टी

त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत - राजू शेट्टी नरेंद्र मोदी

केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत. शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यासाठी शेतक-यांनी पेटून उठले पाहिजे. शेतक-यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय, त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मंत्र्यांना मारले तर पोलीस तुमचे काहीही करू शकत नाही. तुमच्यामुळे भाजप सत्तेत आहे. शासनाला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निंबा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, दुधाची भाववाढ असे आंदोलन करून शेतक-यांना न्याय मिळवून दिला. आता विदर्भात कापूस, सोयाबीनचे दर घसरले. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी शासनाला असा अल्टिमेटम दिला. कापूस, सोयाबीनला भाव मिळाला नाही, तर १९ ऑक्टोबरनंतर विदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. विदर्भातील शेतक-यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन एकही चाक फिरू देऊ नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

शासनाने शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करावा, कापूस, सोयाबीनला उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार रुपये द्यावेत, आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे मांडल्या आहेत. असे सांगत, खासदार शेट्टी यांनी शासनाने सात लाख टन पामतेल विदेशातून आयात केले.