भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : “भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे. ते शेतकऱ्यांच्या बायकांकडे वाकडया नजरेने बघत आहेत.एव्हढं हिन कृत्य करुनदेखील बँक अधिकाऱ्याला एका दिवसात जामिन मिळतोच कसा? देवेंद्र फडणवीस तुमच्या घरातल्या बाईकडे असं कोणी वाकड्या नजरेने बघितलं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? आमच्या शेतकऱ्याच्या बाया काय रस्त्यावर पडल्या आहेत का? तुमचं गृहखातं काय करतं? पुरावे असताना पोलिसांनी ही केस कोर्टासमोर सक्षमपणे मांडली नाही” असा घणाघात करत खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच फैलावर घेतल आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार तोफ डागली.

दरम्यान, . पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला होता. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तर या नराधमांना अटक करून अवघ्या दोन दिवसांत जामीन मंजूर झाल्याने राजू शेट्टी संतापले आहेत.

सबंधित बातम्या 

संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे

अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे – अशोक चव्हाण

संतप्त शेतकऱ्यांनी फासल सेंट्रल बँकेला काळं !

अखेर ‘तो’ निर्लज्ज बँक मॅनेजर निलंबित