पिक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी सरकारने करावी, राजू शेट्टी यांची मागणी

राजू शेट्टी

पिक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी सरकारने करावी. अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यामधील रब्बी पिकाला पिक विमा कंपन्यांनी नाकारलेल्या विमा कवचावर ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या ; नवनीत राणांची मागणी

यापूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी आंदोलन केलं. मात्र, आता ते स्वत: मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी पिक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे. तर सत्तेत असतांना विमा कंपन्यांच्या विरोधात विरोधी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आता स्वत: मुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्या कडे सर्व अधिकार आहेत. त्यांनी विमा कंपन्यांना जाब विचारावा असेही वाशीममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर वाशीमचे जिल्हाध्यक्ष दामू इंगोले उपस्थित होते.