कारखानदार प्रतिनिधींच्या बैठकीला दांडी मारून राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट

राजू शेट्टी

महापुरातील बुडीत ऊस उचलणे, घसरणारा साखर उतारा, कर्नाटक सरकारची झोनबंदी आणि हंगामाचा कमी कालावधी, या पार्श्वभूमीवर कारखाने सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी संघर्षाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घ्यावी, असे आवाहन कारखानदारांनी केले. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर कारखानदार प्रतिनिधींची बैठक होत आहे.

या बैठकीत ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीत बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला राजू शेट्टी यांनी दांडी मारली आहे. इतर शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी देखील अनुपस्थित आहेत.

दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये वेगवान घडामोडी सुरु आहेत. काल दुपारी ४ वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संघटनेचे शिष्टमंडळही उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांनी यापूर्वी दरातील स्पर्धेमुळे एफआरपीपेक्षा जादा रक्कम दिली आहे. कारखाने मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, यंदा रिकव्हरी कमी होणार असल्याने कारखाने आणि ऊस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्यामुळे कारखानदारांच्या अडचणी सांगून त्यात मार्ग काढण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत फायदे

शेतकऱ्याला समृद्ध करण्याची क्षमता ही फलोत्पादनात आहे – शरद पवार

उद्धव ठाकरे यांना आत्ताच शेतकऱ्यांचा पुळका कसा आला – राजू शेट्टी

सरपंच, उपसरपंचांचे मानधन आता ऑनलाइन पद्धतीने