आमचा हनुमान सत्तेच्या लंकेतच रमला – राजू शेट्टी

सांगली : शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या हनुमानाला भारतीय जनता पक्षाच्या लंकेत पाठविले होते. परंतु आमचा हनुमान सीतेला मुक्त करण्याऐवजी लंकेतील सत्तेतच रममाण झाला, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.त्यामुळे आगामी काळात शेट्टी विरुद्ध खोत असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत .

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकेकाळचे सहकारी. स्वाभिमानी उभा करण्यात तसा या दोघांचा महत्वाचा वाट होता . मात्र दोघांमध्ये मतभेद वाढत गेल्याने मैत्री संपली आणि आता एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनत चालले आहेत . शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांसाठी यापुढे लढत राहणार असे सांगत शेट्टी नुकतेच NDA तून बाहेर पडले . खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली यात शेलक्या भाषेत खोत यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले शेट्टी ?
आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आपल्याविरोधात कोणालाही उभे करा. त्याला धडा शिकविण्याची हिंमत आपल्यात आहे सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपबरोबरीनेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपण चांगली अद्दल घडवली आहे.शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या हनुमानाला भारतीय जनता पक्षाच्या लंकेत पाठविले होते. परंतु आमचा हनुमान सीतेला मुक्त करण्याऐवजी लंकेतील सत्तेतच रममाण झाला.