कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण; आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

टीम महाराष्ट्र देशा:  राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफी जाहीर करताना ८९ हजार शेतकऱ्याना लाभ होणार असल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप केवळ 36 हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. त्यामुळे आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याच दिसत आहे.

ऐतिहासिक शेतकरी संपानंतर राज्य सरकारकडून ३४ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी घोषित करण्यात आली होती. ही कर्जमाफी म्हणजे ऐतिहासिक निर्णय असल्याच सत्ताधारी भाजपकडून सांगण्यात आलं. पण गेल्या वर्षभरात जवळपास 230 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे या कर्जमाफीमध्ये काही एक अर्थ राहिलेला नसल्याची टीका खा राजू शेट्टी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी

कर्जमाफी हा उपाय नाहीच – एम. एस. स्वामिनाथन