“काल शिवाजी पार्कवर चुकीच्या रावणाला आग लावली खरे रावण तर व्यासपीठावर होते..”

शिवसेनेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा मुंबई यथे शिवाजी पार्कवर संपन्न झाला. दरम्यान, मेळाव्याला आलेले कार्यकर्ते मोदी सरकार विरोधात घोषणा देत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील अपशब्दांचा वापर केला. ‘काल शिवाजी पार्कवर चुकीच्या रावणाला आग लावली खरे रावण तर व्याजपीठावर होते’ असे टीकास्त्र खासदार निलेश राणेंनी शिवसेनेवर सोडले आहे.

शिवसेना सत्तेत असूनही स्वतःला शिव्या घालते. स्वतःला शिव्या घालणारे विचारवंत व सत्तेतले भागीदार. असं नीच राजकारण देशात कोणीही केलं नसेल, अशी टीका खासदार निलेश राणे यांनी केली आहे.