राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

कोरोना

अहमदनगर – अलीकडच्या काही दिवसांपासून नगरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नगरमध्ये ऑक्टोबरमध्ये कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची आकडेवारी होती. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी झाल्याचे मानले जात होते. नगरमध्येच नव्हे, तर राज्यात ही आकडेवारी एकदम कमी झाली होती. दिवाळीनंतर मात्र पुन्हा शासकीय कागदपत्रातील मृत्यूचा रकाना भरू लागला आहे. नगरमध्ये काल दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी एवढे मृत्यू होण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर घडल्याने चिंतेची बाब आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझर याचा वापर करून दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

काल जिल्ह्यात रूग्ण संख्येत 273 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार 741 इतकी झाली आहे. काल 337 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59 हजार 383 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 95.71 टक्के इतके झाले आहे. काल जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 10, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 119 आणि अँटीजेन चाचणीत 144 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा 07, नगर ग्रामीण 01, संगमनेर 01, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा 31, अकोले 07, जामखेड 02, कोपरगाव 06, नगर ग्रामीण 08, नेवासा 14, पारनेर 04, पाथर्डी 05, राहाता 12, राहुरी 06, संगमनेर 18, शेवगाव 02, श्रीगोंदा 01 आणि श्रीरामपूर 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 07, अकोले 12, जामखेड 02, कर्जत 14, कोपरगाव 05, पारनेर 18, पाथर्डी 16, राहाता 13, राहुरी 04, संगमनेर 10, शेवगाव 14, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 21 अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –