रसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी

टीम महाराष्ट्र देशा- ‘शनाया’ या सुप्रसिद्ध कॅरेक्टरमुळे अभिनेत्री रसिका सुनील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिचा चाहतावर्गदेखील खूप मोठा असून, त्यांना आवरणं प्रोडक्शन टीमसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे. निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित आगामी ‘गॅटमॅट’ सिनेमाच्या सेटवर तिच्या चाहत्यांनी संपूर्ण युनिटला असंच भरपूर हैराण करून सोडलं होतं.

रसिकाला बघण्यासाठी तिचे चाहते सेटवर बांधण्यात आलेली उंच सुरक्षाभिंतदेखील ओलांडून येत असे. सेटवरील कडक बंदोबस्तामुळे तिच्यापर्यंत पोहोचणे अगर शक्य झाले नाही तर, मोबाईलवरून तिचा गुपचूप फोटो किंवा व्हिडियो काढण्याचा प्रयत्न हि मंडळी करत असे. अश्याप्रकारे, एेन चित्रीकरणादरम्यान होत असलेल्या चाहत्यांच्या घुसखोरीमुळे सेटवरील कामं बऱ्याचदा खोळंबलीदेखील होती.

अवधूत गुप्ते प्रस्तुत व यशराज इंडस्ट्रीज निर्मित ‘गॅटमॅट’ या सिनेमात रसिकाची प्रमुख भूमिका असून, लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.