‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांना तातडीने मदत निधी पोचवा  

यवतमाळ – नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून निधी लवकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हास्तरावरून हा निधी तालुकास्तरावर वितरित सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी तसेच नागरिकांना या निधीचे तातडीने वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलेले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे त्यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत कि जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘शासनाच्या ९ नोव्हेंबरच्या पत्रानुसार जिल्ह्याला १८ कोटी ६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत असे त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे तसेच पशुधनाचे नुकसान, घरांची पडझड, मृत्यू आदींसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. या संपूर्ण निधीचे दोन-तीन दिवसांत वाटप करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने प्राधान्याने नियोजन करावे असे देवेंदर सिंह बोले.

कोणत्याही परिस्थितीत हा निधी नुकसानग्रस्तांना वेळेत मिळाला पाहिजे असे त्यांचे बोले. तसेच दैनंदिन किती निधीचे वाटप झाले, या बाबतचा अहवाल रोज सायंकाळी जिल्हास्तरावर सादर करावा. निधी वाटपाबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँकेच्या प्रतिनिधींना त्वरित सूचना द्याव्यात.’’

महत्वाच्या बातम्या –