‘व्हॅलेंटाइन डे’करिता गुलाब परदेशात जाण्यासाठी सज्ज

‘व्हॅलेंटाइन डे’करिता प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब बाजारात सज्ज झाला आहे. मावळमध्ये गुलाबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जातात . व्हॅलेंटाइन डे अवघ्या काही दिवसांवर आल्याने मावळातील गुलाब परदेशी बाजारपेठेत पाठविण्याकरिता लगबग सुरू झाली आहे. जवळपास ५० लाख गुलाबांची निर्यात होणार आहे. तसेच शेवटच्या चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेतही गुलाब रवाना होणार आहे.

हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव

मावळमध्ये जवळपास साडेसहाशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पॉलीहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन केले जातात. परदेशी बाजारात ‘व्हॅलेंटाइन डे’करिता गुलाब फुलांना मोठी मागणी असल्याने परदेशात जवळपास साठ टक्के फुले ही मावळातून निर्यात केली जातात. वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे त्याचा काही प्रमाणात फूल उत्पादनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पालेभाज्या आणि त्याचे फायदे

विदेशी तसेच देशी बाजारपेठेत फुलांना चांगला भाव मिळेल ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’ला गुलाब फुलांची सर्वाधिक मागणी असल्याने या काळात जास्तीत जास्त गुलाब फुलांचे उत्पादन कसे होईल, याकरिता डिसेंबर महिन्यापासून शेतकरी नियोजन करतात.