कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना ठरल्या फोल – धनंजय मुंडे

मुंबई: अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून आत्महत्या केलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. तसेच १०० योजना जाहीर केल्या तरी शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला.

धनंजय मुंडे म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला असला तरी ही तूट प्रत्यक्षात ४० हजार कोटी पर्यंत जाणार आहे. राज्य कर्जबाजारी झाले असून सदर कर्ज शासन कसे फेडणार आहे. उत्पन्न वाढीची टक्केवारी घसरली आहे. उत्पन वाढीचे स्तोत्र सरकारच्या हातून निसटून जात आहेत. तसेच शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत.