शेतकरी मानधन योजनेच्या (पीएम-केएमवाय) नोंदणीस सुरूवात

शेतकरी

केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. कृषिमंत्री म्हणाले, की शेतकरी हे खूप काबाडकष्ट करतात. तरीही त्यांना पुरेशे उत्पन्न मिळत नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या विधायक योजना सुरू केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ‘पीएम-केएमवाय’ योजना. देशभरात ‘पीएम-केएमवाय’ योजनेसाठी शुक्रवारी (ता. ९) देशभारात नोंदणी सुरू झाली आहे. तसेच शुक्रवारी दुपारपर्यंत ४१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

या योजनेमध्ये शेतकऱ्याकडे २ हेक्टरपर्यंत शेती असेल तर १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना ऐच्छीक व योगदानासहित सहभागी होता येणार आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति महिना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. ‘पीएम-केएमवाय’ ही योजना संपूर्ण देशात लागू आहे.

यासाठी शेतकऱ्यांना मोफत नोंदणी आहे. तसेच योजनेची नोंदणी ही समायिक सुविधा केंद्रांमध्ये (सीएससी) होणार आहे. ‘सीएससी’ प्रत्येक शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी ३० रुपये फी आकारणार आहे. मात्र हे शुल्क शासन भरणार असल्याने शेतकऱ्यांसाठी नोंदणी मोफत आहे, अशी माहिती कृषिमंत्री तोमर यांनी दिली.

तसेच या योजनेत शेतकरी पती-पत्नीलाही वेगवेगळी नोंदणी करता येणार आहे आणि हप्ते भरून सहभागी होत येणार आहे. नोंदणी केल्यानंतर दोघांनाही  तीन ,तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल. तसेच निवृत्तीच्या तारखेच्या आतच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ही योजना सुरू ठेवता येईल. जर मृत शेतकऱ्याच्या पत्नीला ही योजना सुरू ठेवायची नसेल तर शेतकऱ्याने योजनेत भरलेली रक्कम व्याजासह पत्नीला देण्यात येईल. शेतकऱ्याची पत्नी ह्यात नसल्यास त्याच्या वारसाला ही रक्कम दिली जाईल. निवृत्तीनंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पत्नीला ५० टक्के निवृत्तीवेतन मिळेल.

जर शेतकऱ्यांना यातून बाहेर पडायचे असेल तर त्याला किमान पाच वर्षांनंतर बाहेर पडता येईल. या वेळी शेतकऱ्यांना त्यांनी भेरलेली रक्कम बॅंक देत असलेल्या व्याजाप्रमाणे व्याज एलआयसी देणार आहे. जे शेतकरी पीएम-किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची इच्छा असल्यास पीएम-केएमवाय’ योजनेचा हप्ता थेट या लाभातून कापण्यात येईल. जर शेतकऱ्याने नियमित हप्ते नाही भरले तर थकबाकी रक्कम आणि ठरलेले व्याज भरून शेतकरी पुन्हा या योजनेत सहभागी होऊ शकतात.

‘पीएम-केएमवाय’ योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या वयोगटानुसार ५५ ते २०० रुपये प्रतिमहिना हप्ता भरावा लागणार आहे. हा हप्ता नोंदणी झालेल्या महिन्यापासून ते निवृत्ती होण्यापर्यंत भरावा लागणार आहे. शेतकरी भरत असलेल्या हप्त्याएवढाच निधी केंद्र सराकार निवृत्तीवेतन निधीमध्ये जमा करणार आहे, असेही तोमर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

राज्य सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

अलमट्टीतून ५ लाख, कोयनेतून ७७ हजार ९८७ तर राधानगरीतून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम
Loading…