जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणला भन्नाट रिचार्ज प्लॅन

जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्त आणि भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. केवळ 10 रुपयांच्या या  IUC टॉपअप प्लॅनमध्ये ग्राहकांना 124 कॉलिंग मिनिट्स मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर दर 10 रुपयांच्या रिचार्जमध्ये तब्बल एक जीबी डेटाही वापरायला मिळेल. रिलायंस कंपनीने प्लॅनचे दर वाढवले, तसेच अन्य नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगही बंद केली आणि IUC चार्ज आकारण्यास सुरुवात केली.

तेव्हापासून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्सची आवश्यकता भासते. हे नॉन जिओ मिनिट्स संपल्यानंतर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट आकारले जातात. हे नॉन जिओ मिनिट्स संपल्यानंतर ग्राहकांना टॉप अप रिचार्ज करावा लागतो. अशा ग्राहकांसाठी जिओने हा 10 रुपयांचा खास टॉप-अप रिचार्ज प्लॅन आणला आहे.