शेतकऱ्यांना दिलासा; दिवाळी निमित्त झेंडू फुलांची मागणी वाढली

यंदा पावसामुळे दसरा व दिवाळी सणाच्या अनुषंगाने झेंडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले. परंतु भाव तुलनेने चांगला मिळत असल्याने हे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं दिसत आहे. दिवाळीच्या काळात जागेवरूनच ८० ते ९० रुपये किलोला दर मिळत असल्याचे शेतकरी आनंदात सांगत आहेत.

यंदा पावसामुळे झेंडू उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शिवाय यंदा झेंडूची लागवडही कमी प्रमाणात झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूचे उत्पादन कमी असल्याने हे शेतकरी चिंतेत होते. परंतु आता दिवाळीच्या काळात दर चांगले मिळत असल्याने झेंडू उत्पादक शेतकरी चिंतामुक्त झाले असल्याचं दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिवाळीसाठी झेंडूची तोडणी जोमाने सुरू आहे. बाजारात विविध रंगी झेंडूच्या फुले आकर्षण बनले आहेत.

महत्वाच्या बातम्या –