कोरोना उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची अनेक कारणासाठी चाललेली पळापळ आपण अनेक दिवस पाहतो आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार पाहायला मिळाला. साधारण दीड हजार रुपये किमतीचे हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंत विकलं गेलं. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटकही केली.

पण आता कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं स्पष्ट केले आहे. कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघनेनं सांगितलंय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती WHOने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –