कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी विभागीय उपायुक्त यांना निवेदन

कांदा

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटेनाच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. अतिवृष्टमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. राज्य सरकारने याबाबात लक्ष घालून केंद्र सरकारकडून तात्काळ निर्यात खुली करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नागपूरमध्ये कांद्याच्या दरात घसरण, लसूण मात्र आवाक्याबाहेर

रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने मागील काही दिवसापासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वात जास्त कांद्या उत्पादक महाराष्ट्रात असून येथे चांगल्या पध्दतीने कांदा उत्पादन होते. असे असतांनाही  शेतक-यावर अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी विभागीय उपायुक्त यांना निवेदन magni