आरक्षण मिळाले ; जाणून घ्या कसे काढावे मराठा आरक्षण प्रमाणपत्र

मराठा आरक्षण प्रमाणपत्र

मोठ्या संघर्षानंतर मराठा  सामाज्याला  शिक्षणासाठी १२ तर नोकऱ्यांसाठी १३ टक्के आरक्षण न्यायालयाने वैध ठरविले आहे. यासाठी आता एसईबीसी काढावे लागणार आहे. आता हे प्रमाणपत्र कसे काढायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकेल. ही संपूर्ण पद्धत ऑनलाइन असून प्रत्येक जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रामध्ये यासाठी नागरीकांना अर्ज करता येणार आहे.

 •  अर्ज केल्यानंतर २१ दिवसंचा हे प्रमाणपत्र देण्याचा कालावधी आहे .
 • यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ही कागदपत्रे खालीलप्रमाणे

१. जात प्रमाणपत्र हवे असलेल्या व्यक्तीचा स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)

२. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास बोनाफाईड सर्टीफीकेट (जन्मतारीख व जातीचा उल्लेख आवश्यक)

३. वडिलांचा जन्म १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वी झाला असल्यास त्यांचा जातीचा पुरावा. य़ासाठी खालीलपैकी एक कागदपत्र लागेल.

 • शाळेचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)
 • जन्म-मृत्यूची नोंद असलेला महसूल अभिलेखातील पुरावा
 • शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचा जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
 • समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
 • वडिलांचा जातीचा दाखला नसल्यास तसे शपथपत्र देणे आवश्यक आहे.

४. बहिण-भावांचा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)

५. वंशावळ

६. महसूल पत्र

७. रहिवासी प्रमाणपत्र

८. रेशनकार्ड

९. आधारकार्ड

१०. एक छायाचित्र

 • अर्जावर सर्व माहिती अचूक भरली आहे का ते तपासून घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
 • अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे.
 • विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
  अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा कोणताही एक पुरावा
  ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
  क) राजपत्रात (Gazette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस यांचा दाखला

महत्वाच्या बातम्या –

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ

शेतकऱ्यांची आत्महत्या पाहण्यासाठी पुन्हा यायचं का ? – मेहबूब शेख