प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी – दादा भुसे

शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारे अभियान तालुका स्तरावर घ्यावेत, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. महिनाभरात ही बॅंक तयार करावी, अशा सूचनाही दादा भुसे यांनी दिल्या आहेत.  दादा भुसे यांनी मंत्रालयात सुमारे तीन तास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक, सहसंचालक, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेतली.

३ महिने उलटून फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही

क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या विविध अडचणींची माहिती कृषिमंत्र्यांनी करून घेतली. योजनांची अंमलबजावणी करताना ज्या समस्या येतात त्यावर मार्ग काढला जातो मात्र त्यामुळे बऱ्याचदा यंत्रणेला रोषाला सामोरे जावे लागते, हे टाळण्यासाठी काय करू शकतो आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

सातत्याने बदलत्या वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथा बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास त्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी फळपिके, भाजीपाला यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी, अशी सूचना कृषिमंत्र्यांनी केली. या शेतकऱ्यांच्या बॅंकेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन तेही प्रात्यक्षिकांसह देण्याचा मानस असल्याचे भुसे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायमच शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचे सांगत शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना राबवाव्यात, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.